
नवी दिल्ली , 5 नोव्हेंबर (हिं.स.)। अमेरिकेच्या राष्ट्रपती कार्यालय व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनाने भारतात राजकीय हलचल निर्माण केली आहे. व्हाइट हाऊसकडून नुकतेच सांगण्यात आले आहे की राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमीच परस्परांशी संवाद साधत असतात. यावरून काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी बुधवारी प्रश्न उपस्थित केला की पंतप्रधान मोदी हे याबद्दल खुलेपणाने सांगायला का तयार नाहीत आणि अखेर ते कोणत्या गोष्टीला घाबरत आहेत?
काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी पंतप्रधानांवर टोला लगावत म्हटले की देशातील जनतेला ही माहिती सुद्धा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या निवेदनातूनच मिळाली की “ऑपरेशन सिंदूर” थांबवण्यात आले आहे. त्यांनी पुढे सांगितले की आता लोकांना व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांच्या माध्यमातून हे कळले आहे की राष्ट्रपती ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी व्यापार कराराबाबत सतत संवाद साधत आहेत.रमेश म्हणाले, “पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात संवाद होणे आवश्यकच आहे. पण पंतप्रधान हे स्वीकार का करत नाहीत की ते ट्रम्प यांच्याशी बोलतात? अखेर ते कोणापासून घाबरत आहेत?”
काँग्रेस नेत्यांची ही टिप्पणी व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांच्या त्या निवेदनानंतर आली आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की राष्ट्रपती ट्रम्प हे भारत-अमेरिका संबंधांच्या भविष्यासंदर्भात अतिशय सकारात्मक आणि उत्साही आहेत.
लेविट यांनी सांगितले की काही आठवडे पूर्वी दिवाळीच्या निमित्ताने व्हाइट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये वरिष्ठ भारतीय-अमेरिकन अधिकाऱ्यांसोबत साजऱ्या केलेल्या समारंभादरम्यान ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी थेट संवाद साधला होता. त्यांनी असेही सांगितले की राष्ट्रपती आणि त्यांची व्यापारिक टीम भारताशी गंभीर चर्चेत आहेत आणि ते पंतप्रधान मोदींचा खूप सन्मान करतात तसेच त्यांच्याशी नेहमी संवाद साधतात.
गेल्या महिन्यात ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमध्ये दिवाळीचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये भारताचे राजदूत विनय क्वात्रा, तसेच अनेक नामांकित भारतीय-अमेरिकन उद्योजक आणि समुदाय प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. ट्रम्प यांनी त्या वेळी फोनवरून पंतप्रधान मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या, ज्यावर मोदींनी एक्सवर प्रतिसाद देत म्हटले होते, “आपल्या प्रेमळ फोन कॉल आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद, राष्ट्रपती ट्रम्प. आपल्या दोन्ही महान लोकशाही या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने जगाला आशेचा प्रकाश देऊ देत आणि दहशतवादाच्या प्रत्येक स्वरूपाविरुद्ध एकत्र उभ्या राहू देत.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode