
जळगाव, 7 नोव्हेंबर (हिं.स.)शुक्रवारी, ७ नोव्हेंबर रोजी सोन्यासह चांदीच्या किंमतीत वाढ दिसून येत आहे. अर्थात 22 कॅरेट सोने दर प्रति तोळा १,०९,९०० रुपये, 24 कॅरेट सोने दर प्रति तोळा १,२०,००० रुपये आहे. तर चांदी प्रति किलो दर १,५०,००० रुपये आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात झालेल्या घसरणीनंतर बाजार आता पुन्हा वाढीच्या टप्प्यावर जात असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य, आंतरराष्ट्रीय सोन्या-चांदीचा फ्यूचर बाजार आणि लग्नसराईतील ग्राहकांची मागणी हे घटक दरात स्थिर वाढ दाखवत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर