नाशिक : गुन्हे शाखेच्या कार्यालयात आरोपीच्या पत्नीचा गोंधळ
नाशिक, 8 नोव्हेंबर (हिं.स.) : नाशिकमध्ये गुन्हे शाखेच्या कार्यालयात एका आरोपीची चौकशी सुरू असताना त्याला सोडावे म्हणून आरोपीच्या पत्नीसह तिच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी शासकीय कामात अडथळा आणून गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबा
नाशिक : गुन्हे शाखेच्या कार्यालयात आरोपीच्या पत्नीचा गोंधळ


नाशिक, 8 नोव्हेंबर (हिं.स.) : नाशिकमध्ये गुन्हे शाखेच्या कार्यालयात एका आरोपीची चौकशी सुरू असताना त्याला सोडावे म्हणून आरोपीच्या पत्नीसह तिच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी शासकीय कामात अडथळा आणून गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस शिपाई शांताराम गांगोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की फिर्यादी हे कर्तव्यावर असताना उपनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी कैलास बाबूराव मैंद याला पोलिसांनी अधिक तपासासाठी युनिट-१ च्या कार्यालयात आणले होते. त्यावेळी तपास चालू असताना आरोपी सारिका सुभाष पवार ऊर्फ सारिका कैलास मैंद (रा. हरिविहार सोसायटी, जेलरोड, नाशिकरोड) या महिलेने गैरकायद्याची मंडळी जमवून कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; मात्र फिर्यादीने त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. त्याचा सारिका मैंद यांना राग आला. या महिलेने तिचे सहकारी प्रशांत श्रीकृष्ण गारमोरे (रा. वृंदावन गार्डन, जेलरोड), दीपक दत्तू किडवई (रा. वीर सावरकरनगर, जेलरोड), रवी जाधव, अजय पाटील, नितीन परदेशी, देवा शिसोदे व इतरांनी फिर्यादीला धक्का देऊन महिला पोलीस कर्मचा-याची गच्ची पकडून शिवीगाळ केली, तसेच आरोपी कैलास मैंदला सोडले नाही, तर आत्महत्या करण्याची, तसेच गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सारिका मैंदसह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाप करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande