जळगाव - पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; १५ संशयित ताब्यात
जळगाव, 8 नोव्हेंबर (हिं.स.) मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी व लालगोटा परिसरात विविध आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मुक्ताईनगर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने भव्य को
जळगाव - पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; १५ संशयित ताब्यात


जळगाव, 8 नोव्हेंबर (हिं.स.) मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी व लालगोटा परिसरात विविध आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीबाबत मिळालेल्या गुप्त माहितीनंतर मुक्ताईनगर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या सहकार्याने भव्य कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या मोहिमेत पोलिसांनी १५ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यापैकी दोन जण हे दरोड्याच्या गुन्ह्यात वॉण्टेड असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित १३ संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२८ आणि १२९ अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मधापुरी येथील कमलेश्वर ज्ञानेश्वर पाटील (४५) आणि दीपमाला कमलेश पाटील (३८) या दोघांवर भारतीय न्याय संहिता कलम ३१० (२) अंतर्गत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. ३६/२०२५ मध्ये दरोड्याच्या गुन्ह्यातून पसार असल्याने त्यांना अटक करण्यात आली.

दरम्यान, चोरी आणि लुटीच्या गुन्ह्यांमध्ये पूर्वीचा रेकॉर्ड असलेल्या खालील १३ संशयितांविरोधात कारवाई करण्यात आली. यात मधापुरी येथील रोहित ऊर्फ गुरुदास सुदेश पवार (२५), क्रिश निशांत पवार (१९), किसन दिनु पवार (२१), नितेश रितेश पवार (३०), आर्यमन जिन्नु पवार (१९), गीता नागेश पवार (३८) यांचा समावेश आहे. तर लालगोटा येथील धरमसिंग लखनसिंग भोसले (२५), लखनसिंग युवराज भोसले (५०), बाबुसिंग लखनसिंग भोसले (१९), टोनी दर्शनलाल पवार (४३), लकी टोनी पवार (२२), सदानंद टोनी पवार (२५) तसेच हलखेडा येथील नयन सटा भोसले (२५) यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेचे नेतृत्व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड आणि मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांनी केले. कारवाईसाठी सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, १३० पोलीस अंमलदार आणि चार आरसीपी पथके तैनात होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande