भारताचा डी गुकेश फिडे बुद्धिबळ विश्वचषकातून बाहेर
पणजी, 9 नोव्हेंबर (हिं.स.)जर्मनीच्या फ्रेडरिक स्वानेकडून पराभव पत्करून विश्वविजेता डी. गुकेश बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतून बाहेर पडला. तिसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्यात गुकेशला पराभव पत्करावा लागला. दरम्यान, इतर भारतीय खेळाडूंनी शान
डी गुकेश


पणजी, 9 नोव्हेंबर (हिं.स.)जर्मनीच्या फ्रेडरिक स्वानेकडून पराभव पत्करून विश्वविजेता डी. गुकेश बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतून बाहेर पडला. तिसऱ्या फेरीच्या दुसऱ्या सामन्यात गुकेशला पराभव पत्करावा लागला. दरम्यान, इतर भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. अर्जुन एरिगेसी आणि प्रज्ञानंद यांनी अनुक्रमे उझबेकिस्तानच्या शमसिद्दीन वोखिदोव आणि आर्मेनियाच्या रॉबर्ट होव्हानिसियान यांचा पराभव करून अंतिम-३२ टप्प्यात प्रवेश केला.

यापूर्वी, भारतीय ग्रँडमास्टर पी. हरिकृष्ण आणि व्ही. प्रणव यांनीही आपापले सामने जिंकून अंतिम-३२ टप्प्यात प्रवेश केला. हरिकृष्णाने बेल्जियमच्या डॅनियल दर्धाचा १.५-०.५ असा पराभव केला, तर प्रणवने लिथुआनियाच्या टिटास स्ट्रेमाविसियसचा त्याच फरकाने पराभव केला. हरिकृष्ण स्पर्धेच्या अंतिम-३२ मध्ये पोहोचणारा पहिला भारतीय ठरला. त्याने सुरुवातीच्या सामन्यात चमकदार कामगिरी करत आघाडी घेतली आणि दुसऱ्या सामन्यातही आपली आघाडी कायम ठेवली. प्रणवने काळ्या मोहऱ्यांसह आपला सामना अनिर्णीत ठेवला आणि नंतर पांढऱ्या मोहऱ्यांसह निर्णायक विजय मिळवला.

दिप्तयन घोषचा प्रवास तिसऱ्या फेरीत संपला. त्याने पहिला सामना आर्मेनियाच्या गॅब्रिएल सार्गिसियनविरुद्ध बरोबरीत सोडवला पण दुसरा सामना गमावला. मागील फेरीत रशियन अनुभवी इयान नेपोम्नियाच्चीचा पराभव करणाऱ्या दिप्तयनला ०.५-१.५ असा पराभव पत्करावा लागला आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande