
कॅनबेरा, 8 नोव्हेंबर (हिं.स.) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताच्या फलंदाजीदरम्यान ४.५ षटकांनंतर खेळ थांबवण्यात आला. पंचांनी सामना अनिर्णित घोषित केला. यामुळे टीम इंडियाने पाच सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. मालिकेतील पहिला सामनाही पावसामुळे रद्द झाला होता.
ऑस्ट्रेलियाने दुसरा टी-२० सामना चार विकेट्सने जिंकला होता. तर भारताने तिसरा आणि चौथा टी-२० सामना जिंकला. टीम इंडियाने तिसरा टी-२० सामना पाच विकेट्सने आणि चौथा टी-२० सामना ४८ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाचा हा सलग चौथा द्विपक्षीय टी-२० मालिका विजय आहे.
यापूर्वी, भारताने २०२०/२१ मध्ये तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला होता. २०२२ मध्ये तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ असा पराभव केला होता. २०२४/२५ मध्ये पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत ४-१ असा पराभव केला होता आणि आता २०२५ मध्ये पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत २-१ असा विजय मिळवला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे