
बीड, 10 डिसेंबर (हिं.स.)।
कोल्हेवाडी (ता. केज) येथील तुळजाई मंदिराच्या सभामंडपसाठी आमदार नमिता मुंदडा यांच्या फंडातून निधी मंजूर झाला आहे. मंगळवारी या सभामंडपाचे भूमिपूजन सैन्य दलातील जवानांच्या हस्ते करण्यात आला.
कोल्हेवाडी येथील तुळजाई मंदिरासाठी सभामंडप उभारणीसाठी निधी देण्याची मागणी ग्रामस्थांनी जेष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी आमदार फंडातून या मंदिराच्या सभामंडपसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने सभामंडपाच्या कामास मंजूरी देण्यात आली. सभामंडपाचे भूमिपूजन भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले मेजर सतीश मिसाळ व मेजर ज्योतीराम मिसाळ यांच्या हस्ते करून प्रत्यक्ष कामाला सुरवात आली. कार्यक्रमाला सरपंच चंदु मिसाळ, नंदकुमार मिसाळ, बाबासाहेब मिसाळ, उपसरपंच श्रीराम खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव मिसाळ, सचिन मिसाळ, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis