'ईव्हीएम स्ट्राँगरुमला' एसआरपीएफचा पहारा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर
बीड, 10 डिसेंबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यात नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीनंतर ''ईव्हीएम स्ट्राँगरुमला'' एसआरपीएफचा पहारा देण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर ठेवली आहे. जिल्ह्यातील नगर परिषदेच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी २ डिसे
'ईव्हीएम स्ट्राँगरुमला' एसआरपीएफचा पहारा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर


बीड, 10 डिसेंबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यात नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीनंतर

'ईव्हीएम स्ट्राँगरुमला' एसआरपीएफचा पहारा देण्यात आला असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर ठेवली आहे.

जिल्ह्यातील नगर परिषदेच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले असुन उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहेत. या निवडणूकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तोपर्यंत मतदानयंत्र निवडणूक विभागाने निर्माण केलेल्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आले आहेत. दरम्यान सदरील मतदानयंत्रांच्या सुरक्षेसाठी राज्य राखीव दलाच्या जवानांचा चोविसतास पहारा ठेवण्यात आला असून स्ट्रॉगरुम परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

राजकीय दृष्ट्या महत्वपुर्ण असलेल्या नगरपालिकेची निवडणुक सर्वच नेते मंडळींनी प्रतिष्ठेची केली होती. मोठ्या प्रमाणात झालेल्या आरोप-प्रत्यारोपाने जिल्हाभरात पालिका निवडणुक गाजली. निवडणूकीतील मतदानयंत्रांच्या सुरक्षेसाठी स्ट्राँगरुम बाहेर राज्य राखीव बलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

मतपेट्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा पोलिस बंदोबस्त स्ट्रॉग रूमसह केंद्राच्या परिसरात ठेवण्यात आला आहे. त्यासाठी पोलिस कर्मचारी आणि अधिकारी असा मोठा फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला. त्याच प्रमाणे स्ट्राँगरुम परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले असून नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून त्यावर नजर ठेवली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande