बीड शहरामध्ये १८.६८ कोटींची थकबाकी; ५८ जणांचा वीजपुरवठा खंडित
बीड, 10 डिसेंबर, (हिं.स.) - बीड शहरातील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक तसेच शासकीय-निमशासकीय असे एकूण ५३ हजार ४१ महावितरण ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर वीज बिल थकबाकी वाढली आहे. शहरातील एकूण थकबाकी १८.६८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही थकबाकी न भरणाऱ्या ५८
बीड शहरामध्ये १८.६८ कोटींची थकबाकी; ५८ जणांचा वीजपुरवठा खंडित


बीड, 10 डिसेंबर, (हिं.स.) - बीड शहरातील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक तसेच शासकीय-निमशासकीय असे एकूण ५३ हजार ४१ महावितरण ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर वीज बिल थकबाकी वाढली आहे. शहरातील एकूण थकबाकी १८.६८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ही थकबाकी न भरणाऱ्या ५८ जणांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्यात महावितरणची १९.०२ कोटी रुपयांची मागणी होती. तर १६.०४ कोटी वसुली झाली असून २.९८ कोटींची थकबाकी शिल्लक आहे. थकबाकी दारांवर कारवाईचा बडगा उगारत एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान ५८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. महावितरणकडून वीज बिल

मिळाल्यानंतर ते ३० दिवसाच्या आत न भरल्यानंतर प्रथम मोबाइलवर एसएमएस पाठवला जातो. तीच नोटीस असते. त्यानंतर कर्मचारी ग्राहकांची भेट घेऊन वीज बील भरण्यात असलेल्या अडचणी समजून घेऊन वीज बिल भरण्यास सांगितले जाते. मात्र, प्रतिसाद न दिल्यास कनेक्शन कट करण्याची प्रक्रिया राबवली जाते.

तात्पुरते कनेक्शन कट केल्यानंतर ६ महिन्यांत थकबाकी भरल्यास पुरवठा पुन्हा सुरू केला जातो. अन्यथा कायमस्वरूपी कनेक्शन बंद केले जाते.

बीड शहरातील थकबाकीचा आकडा हा १८ कोटीवर आहे. यातील सर्वाधिक थकबाकी शहरातील काही विशिष्ट भागातच आहे.

बीड शहरातील ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा सुरळी केला जात आहे. वीज बील थकवणाऱ्यांचे कनेक्शन कट करण्याची मोहीम जिल्हाभर सुरू आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande