बीडमध्ये तहसीलदारांची बनावट सही करुन क्षेत्र दुरुस्तीचे काढले आदेश
बीड, 10 डिसेंबर (हिं.स.)। बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीने २४१ कोटींचा मावेजा घोटाळा अजून संपलेला नसतानाच महसूल विभागात आता नवा घोटाळा समोर आला आहे. केजच्या तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन सातबाऱ्यावरील क्षेत्र दुरुस्तीचे तब्बल ५ आदेश मा
बीडमध्ये तहसीलदारांची बनावट सही करुन क्षेत्र दुरुस्तीचे काढले आदेश


बीड, 10 डिसेंबर (हिं.स.)।

बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट सहीने २४१ कोटींचा मावेजा घोटाळा अजून संपलेला नसतानाच महसूल विभागात आता नवा घोटाळा समोर आला आहे. केजच्या तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या करुन सातबाऱ्यावरील क्षेत्र दुरुस्तीचे तब्बल ५ आदेश मागील वर्षभरात काढण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार केजमध्ये थेट तहसीलदारांच्या बनावट सह्यांचा प्रकार समोर आला आहे. जमीनीच्या सातबारावरील क्षेत्र दुरुस्तीचे अधिकार हे तहसीलदारांना असतात. मात्र तहसिलदारांच्या नावाने बनावट स्वाक्षऱ्यांद्वारे वाघ यांनी दहिफळ बडमाऊली, लाडेगाव, नांदूरघाट आणि वाघे बाभुळगाव या गावातील जमीनीच्या बाबतीत हे आदेश काढण्यात आले आहेत.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर तहसिलदार राकेश गिड्ढे यांनी प्राथमिक चौकशी करून अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांना दिला आहे. यामध्ये सह्या बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे यांनी हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला असून या प्रकरणी विभागीय चौकशी करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली गेली आहे.

त्या आदेशावर केलेल्या सह्या माझ्या नाहीत. ते आदेश मी काढलेले नाहीत. ते बनावट आदेश आहेत प्राथमिक चौकशी करुन अहवाल वरिष्ठांना दिलेला आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाई होईल. गुन्हा नोंद करण्यात येणार आहे राकेश गिड्डे, तहसीलदार, केज यांनी सांगितले

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande