मनमाड- इंदूर रेल्वे मार्गासाठी १५ डिसेंबरला भूसंपादन
मनमाड, 10 डिसेंबर (हिं.स.) : गेल्या अनेक दशकांपासून मनमाड इंदूर रेल्वेमार्ग प्रलंबित असून या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली असून भारत सरकारच्या रेल्वे विभागाने या प्रकल्पासाठी स्वतंत्र निधी देखील उपलब्ध करून दिला आहे येत्या १५ डिसेंबर रोजी मनम
मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी १५ डिसेंबरला भूसंपादन ; दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा प्रकल्प


मनमाड, 10 डिसेंबर (हिं.स.) : गेल्या अनेक दशकांपासून मनमाड इंदूर रेल्वेमार्ग प्रलंबित असून या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात झाली असून भारत सरकारच्या रेल्वे विभागाने या प्रकल्पासाठी स्वतंत्र निधी देखील उपलब्ध करून दिला आहे येत्या १५ डिसेंबर रोजी मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार असून मनमाड शहरातील तसेच या मार्गावर येणाऱ्या अनेक गावातील भूसंपादित करण्यात येणाऱ्या जागा मालकांना याबाबत अधिकृत नोटीस बजावण्यात आले असून येथे १५ डिसेंबर रोजी ही भूसंपादन प्रक्रिया पार पाडणार आहे भविष्यात मनमाड इंदूर हा ३०९ किलोमीटरचा प्रवास अवघ्या काही तासात पूर्ण करता येईल या मार्गामुळे कसमादे भागातील शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी देखील दळणवळणाच्या दृष्टीने हा मार्ग सोयीस्कर ठरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे

केंद्र सरकारचा बहुप्रतिक्षित असा असलेला मनमाड इंदूर हा रेल्वे मार्ग आता प्रत्यक्षात साकारण्यास सुरुवात झाली असून काँग्रेस सरकारच्या काळापासून मनमाड ते इंदूर रेल्वे लाईन व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत महाराष्ट्र राज्य व मध्य प्रदेश तसेच केंद्र सरकार असा संयुक्त मिळून हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असून मागील बजेटमध्ये मनमाड इंदूर या रेल्वे मार्गासाठी रेल्वेच्या विभागाने स्वतंत्र अशी तरतूद केली असून भविष्यात या प्रकल्पासाठी आणखी निधी देखील उपलब्ध करून देण्यात येईल असे रेल्वेच्या विभागातर्फे सांगण्यात आले आहे मुळात इंदूर ते मनमाड हा रेल्वे मार्ग अत्यंत सोयीचा आणि दळणवळणासाठी सोपा होणार आहे मनमाड ते इंदूर हा रेल्वे मार्ग बनवताना नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या मालेगाव शहरातून देखील जाणार आहे यामुळे कळवण देवळा सटाणा अर्थात कसमादे या भागातील व्यापारी शेतकरी यांच्यासाठी हा रेल्वे मार्ग सोयीस्कर ठरणार आहे गेल्या अनेक दशकांपासून मनमाड इंदूर रेल्वे मार्ग होणार याबाबत केवळ चर्चा व वृत्तपत्रात बातम्या याव्यतिरिक्त हालचाल नव्हती मात्र गेल्या दोन बजेटमध्ये रेल्वेच्या विभागाने यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करून ठेवली आहे त्या अनुषंगाने आता कामाला देखील सुरुवात करण्यात आली असुन येत्या १५ डिसेंबर रोजी या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या विभागाने जाहीर केले असून मनमाड शहरासह या रेल्वे मार्गावर येणाऱ्या अस्तगाव खादगाव यासह इतर गावातील जागा मालकांना तशा नोटीसा बजावण्यात आले आहे 15 डिसेंबर रोजी रेल्वे विभागाला लागणाऱ्या जागेची मोजणी करून याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल मनमाड इंदूर हा बहुप्रतिक्षित रेल्वे प्रकल्पातून या प्रकल्पामुळे महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्या कनेक्टिव्हिटी वाढणार आहे व्यावसायिक दृष्टीने देखील मुंबई खालोखाल किंवा मुंबई बरोबरीने इंदूरचे मार्केट आहे यामुळे भविष्यात याचा मोठा फायदा महाराष्ट्रातील जनतेला होईल यात शंका नाही

नाशिकच्या कसमादे पट्ट्याला याचा मोठा फायदा

मनमाड इंदूर हा बहुप्रतिक्षित असा रेल्वे प्रकल्पातून हा रेल्वे मार्ग मनमाड मालेगाव धुळे नरडाणा या मार्गे इंदूर पर्यंत जाणार आहे सध्या कळवण देवळा सटाणा चांदवड मालेगाव या भागातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल मनमाड रेल्वे स्थानकावर आणावा लागतो व इथून तो इतर राज्यात पाठवावा लागतो यासाठी मोठा वेळ जातो व शेतीमाल देखील खराब होण्याची शक्यता असते मात्र आता मनमाड इंदूर हा रेल्वे प्रकल्प झाल्यानंतर कळवण देवळा सटाणा चांदवड मालेगाव अर्थात कसमादे या पट्ट्यातील शेतकऱ्यांना मालेगाव येथून सर्व शेतीमाल लोडिंग अनलोडिंग करता येईल व याचा मोठा फायदा कसमादे पट्ट्याला होईल

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande