
बीड, 10 डिसेंबर, (हिं.स.)। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २१ डिसेंबर रोजी नियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. ही परीक्षा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २१ डिसेंबर रोजी आयोजित केलेली होती. ही परिक्षा पुढे ढकलण्यात आली असून ४ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. तसेच एमपीएससीच्या गट ब, क परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांच्या बैठक व्यवस्थेकरीता २१ डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आलेली परीक्षा उपकेंद्र ४ जानेवारी रोजी नियोजित परीक्षेकरीता निश्चित करण्यात आली आहे. तसेच ४ जानेवारी रोजी निश्चित करण्यात आलेली परीक्षा, उपकेंद्र ११ जानेवारी रोजी नियोजित परीक्षेकरीता निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे तारीख बदलली असली तरी परीक्षा केंद्रात बदल झालेला नसून नियोजित परीक्षाकेंद्रावरच ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis