
लातूर, 11 डिसेंबर, (हिं.स.)। अखिल भारतीय कृषी गोसेवा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मोठी धडक कारवाई करत जवळपास १० टन गोमांसाने भरलेला ट्रक ताब्यात घेत चाकूर पोलिसांच्या हवाली केला. महाराष्ट्रात गोमातेचा राज्यमाता म्हणून सन्मान असताना आणि राज्यात गोहत्याबंदी कायदा लागू असतानाही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गोवंशाची कत्तल होत असल्याचा गंभीर मुद्दा या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आला आहे.
या कारवाईत संघटनेचे आदर्श जैन, जोतिराम क्षिरसागर, विजय भिसे, इटकर यांच्यासह एकूण चार गोरक्षक सहभागी होते. गोरक्षकांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई करून ट्रक पकडत पोलिसांच्या ताब्यात दिला.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यात अनधिकृत गोवंश वाहतूक आणि कत्तलीचे प्रकार वाढत असून, अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी गोरक्षक सतत कार्यरत आहेत. पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
या कारवाईनंतर जिल्ह्यात अनधिकृत गोवंश व्यापार व कत्तलीवर लक्ष ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis