कपाशी खरेदीत शेतकऱ्याची फसवणूक; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल
जळगाव, 11 डिसेंबर (हिं.स.) भडगाव तालुक्यातून एका शेतकऱ्याची कापूस खरेदी करून फसवणूक केल्याची घटना समोर आलीय. निंभोरा व कोठली येथील कापूस व्यापाऱ्यांनी जवळच असलेल्या लोन पिराचे येथील शेतकऱ्यांची इलेक्ट्रिक वजन काट्याद्वारे तब्बल ३० क्विंटल कपाशीच्या
कपाशी खरेदीत शेतकऱ्याची फसवणूक; दोघांविरूद्ध गुन्हा दाखल


जळगाव, 11 डिसेंबर (हिं.स.) भडगाव तालुक्यातून एका शेतकऱ्याची कापूस खरेदी करून फसवणूक केल्याची घटना समोर आलीय. निंभोरा व कोठली येथील कापूस व्यापाऱ्यांनी जवळच असलेल्या लोन पिराचे येथील शेतकऱ्यांची इलेक्ट्रिक वजन काट्याद्वारे तब्बल ३० क्विंटल कपाशीच्या खरेदीत फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.यानंतर या दोन्ही कापूस व्यापाऱ्यांनी गाडी वजन काटा व साहित्य सोडून पळ काढला. याबाबत शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला कोठली व निंभोरा येथील कपाशी व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. लोन पिराचे येथील शेतकरी विजय नारायण पाटील (५०) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,६ ते ८ रोजी दरम्यान वेळोवेळी लोन पिराचे या गावात सार्वजनिक ठिकाणी कापूस व्यापारी राजेंद्र यशवंत पाटील रा. निभोरा व नाना राजधर पाटील रा. कोठली ता. भडगाव यांनी त्यांचे स्वताचे फायद्यासाठी शेतकऱ्यांची २९.८९ क्विंटल कपाशी कमी मोजून २ लाख ३ हजार ३०६ रुपयांची फसवणुक केली आहे. दोन्ही व्यापारी यांचा खोटेपणा उघडकीस आल्याने त्यांचे सोबत आणलेली पिकअप मालवाहतूक गाडी क्रमांक एम.एच १९- बी.एम.२८३६ व त्यात कपाशी व्यापारी यांनी कपाशी मोजणे कामी आणलेला वजनकाटा असे सोडून ते पळून गेल्याने पिकअप मालवाहतूक गाडी व त्यात कपाशी व्यापारी यांनी कपाशी मोजणे कामी आणलेला वजनकाटा असे पोलिस स्टेशनला आणून सुपूर्द केले. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande