
नांदेड, 11 डिसेंबर (हिं.स.)।लवकरच मकरसंक्रांतीचा सण आहे. या सणानिमित्त पंतग उडविण्याची परंपरा आहे. परंतु पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधित असलेल्या नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले आहे. नायलॉन मांजा वापरल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
दरवर्षी मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त पतंग उडविले जातात. परंतु पतंग उडविण्यासाठी नायलॉन, चायनीज मांजाचा वापर करण्यात येतो. या मांजामुळे अनेकांचे जीवही दरवर्षी जातात. तसेच पशुपक्ष्यांनाही दुखापत होते. त्यामुळे या मांजावर बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षीही पोलिसांनी इशारा दिल्यानंतर काही ठिकाणी लपून-छपून या मांजाची विक्री करण्यात येत होती.अशा १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. यंदाही अपायकारक मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. विक्री करणारे, पुरवठादार, साठवणूक करणाऱ्यांच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके बाजारपेठ, गोदामे यांची तपासणी करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis