जळगावात बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला विहिरीत
जळगाव, 13 डिसेंबर (हिं.स.)अमळनेर तालुक्यातील गांधली येथून १० तारखेला बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह १गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आह
जळगावात बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळला विहिरीत


जळगाव, 13 डिसेंबर (हिं.स.)अमळनेर तालुक्यातील गांधली येथून १० तारखेला बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह १गावालगतच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे गांधली येथील जयश्री संजय संदानशिव (वय १८) ही बारावीचे शिक्षण घेणारी तरुणी १० तारखेला दुपारी कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेली होती. सायंकाळपर्यंत ती परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे शोधमोहीम राबवली; मात्र तिचा काहीही पत्ता लागला नव्हता. दरम्यान, जयश्रीच्या वडिलांना गांधली येथील सुनील पाटील यांचा दूरध्वनी आला. त्यांनी गावातीलच धनंजय कुलकर्णी यांच्या शेतातील विहिरीत एका मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती दिली. मृतदेहावर काळ्या रंगाची ओढणी दिसत असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली असता विहिरीतील मृतदेह जयश्रीचाच असल्याची दुर्दैवी खात्री झाली.घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. मयत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार गणेश पाटील करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande