
जळगाव, 13 डिसेंबर (हिं.स.) भुसावळहुन यूपीतील प्रयागराज मार्गावर प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे मध्य रेल्वेने भुसावळ ते प्रयागराज ही विशेष एकेरी गाडी ‘ऑन डिमांड स्पेशल’ म्हणून चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
क्र. ०१२१३ ही गाडी सोमवार, दि. १५ रोजी भुसावळ येथून १८:३५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी प्रयागराज येथे ११:३५ वाजता पोहोचेल.या गाडीला खंडवा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, मदन महाल, कटनी, मैहर, सतना आणि माणिकपूर येथे थांबे असतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर