श्रीक्षेत्र त्रिधारा देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी भरोसे बिनविरोध
परभणी, 13 डिसेंबर (हिं.स.)। श्रीक्षेत्र त्रिधारा देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी शेषराव भरोसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सर्व भक्तगणांचे प्रेम, आशीर्वाद तसेच अपरंपार ईश्वरी कृपेमुळे ही निवड झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्या
श्रीक्षेत्र त्रिधारा देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी भरोसे यांची बिनविरोध निवड


परभणी, 13 डिसेंबर (हिं.स.)।

श्रीक्षेत्र त्रिधारा देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी शिवाजी शेषराव भरोसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सर्व भक्तगणांचे प्रेम, आशीर्वाद तसेच अपरंपार ईश्वरी कृपेमुळे ही निवड झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या निवडीबरोबरच देवस्थान समितीच्या इतर पदाधिकाऱ्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सचिवपदी माणिक शिंदे, उपाध्यक्षपदी ज्ञानोबाराव जावळे, कोषाध्यक्षपदी नामदेवराव चव्हाण तर सहसचिवपदी रामेश्वर शिंदे यांची निवड करण्यात आली.

अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना श्री. शिवाजी शेषरावजी भरोसे यांनी ही निवड म्हणजे ईश्वराने दिलेली सेवाधर्म निभावण्याची पवित्र संधी असल्याचे सांगितले. देवस्थानाचा सर्वांगीण विकास, भक्तांची सेवा तसेच धार्मिक परंपरेचे जतन करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

या बिनविरोध निवडीनंतर भाविक, मान्यवर व ग्रामस्थांकडून नवनियुक्त अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, श्री ओंकारनाथ महाराजांच्या कृपेने देवस्थानाच्या कार्याला नवे बळ मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande