विनय आपटे प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेत मुक्ता लघुपटाला प्रथम पारितोषिक
मुंबई, 13 डिसेंबर (हिं.स.) - विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत पायपिट फिल्म्सच्या मुक्ता या लघुपटाला प्रथम पारितोषिक मिळाले. 15 हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. 25 वर्षावरील खुल्या गटात
फोटो


मुंबई, 13 डिसेंबर (हिं.स.) - विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत पायपिट फिल्म्सच्या मुक्ता या लघुपटाला प्रथम पारितोषिक मिळाले. 15 हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. 25 वर्षावरील खुल्या गटात दुसरा क्रमांक सिंड्रेला या लघुपटाला, ब्लॅक फॉरेस्ट या लघुपटाला तिसरा, तर हर हसबंड या लघुपटला चौथा क्रमांक मिळाला. दुसर्‍या क्रमांकाला दहा हजार रु रोख आणि स्मृति चिन्ह, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकला साडे सात हजार रुपये रोख आणि स्मृति चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. 25 वर्षाखालील वयोगटात आरोह या लघुपटला पहिले आणि ओरखडा या लघुपटला दुसरे परितोषिक मिळाले.

विनय आपटे प्रतिष्ठान आणि विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या लघुपट स्पर्धेचे आयोजन केले होते. या लघुपट स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. पुरस्कार वितरणासाठी सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव, अ‍ॅड गुरू भरत दाभोळकर, अभिनेते जयवंत वाडकर, विजय पाटकर आणि साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य माधव राजवाडे उपस्थित होते. सगळ्यांनीच विनय आपटे यांच्या आठवणी जागविल्या. माझ्यासारख्या अनेक कलावंतांना विनय आपटे यांनी घडविले आहे , नव्या संधी दिल्या आहेत मार्गदर्शन केले आहे, असे पुष्कर श्रोत्री म्हणाले.

या स्पर्धेसाठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, लेखिका रोहिणी निनावे, दिग्दर्शक आणि संकलक राजन वाघडारे, संकलक भक्ति मायाळू आणि अ‍ॅड गुरु भरत दाभोळकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. परीक्षकांच्या वतीने बोलताना पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले की, पुढील वर्षी लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यापूर्वी लघुपट बनविण्यावर एक कार्यशाळा घेण्यात येईल. त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि नंतरच लघुपट बनवावेत.

प्रा. माधव राजवाडे यांनी अश्या प्रकारच्या कला प्रकारांचे आयोजन करण्यासाठी साठ्ये महाविद्यालय नेहमीच सहकार्य करते.

प्रतिष्ठानबद्दल माहिती देताना विश्वस्त वैजयंती आपटे म्हणल्या की, नव्या कलाकारांना संधी देणे, नवीन मुलांना घडविणे हे विनय आपटे यांचे कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही चालवत आहोत. लघुपट स्पर्धेला दिलेल्या चांगल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी सगळ्यांचे आभार मानले. प्रतिष्ठानतर्फे नेहमीच अभिनय, सूत्र संचालन, अश्या विविध प्रकारच्या कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande