
अकोला, 14 डिसेंबर (हिं.स.)।
पक्षाच्या विचारांशी गद्दारी करणारे तसेच पक्ष उमेदवारांना पराभूत करण्याचा प्रयत्न करणारे पक्षाच्या विरोधात प्रचार करणारे मुर्तीजापुर येथील कमलाकर गावंडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमोल पिंपळे यासह दोन जणांना पक्ष कारवाई चा पुरावा तसेच उमेदवार हर्षद साबळे तसेच महानगरपालिकेतील उमेदवारांच्या तक्रारीवर जिल्हा भाजपा अध्यक्ष संतोष शिवरकर यांनी सहा वर्षासाठी निलंबित केले आहे व त्यांना पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करून त्यांना कोणत्याही संघटनेच्या कार्यक्रमात बोलवण्यात येऊ नये.
भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार विरुद्ध व पक्ष विरोधी कार्यकरणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली असून पक्ष शिस्त पक्ष विचार पक्ष आचरण पक्षाविषयी आपुलकी पक्षाने दिलेले उमेदवार पक्षाने दिलेले कार्यक्रम यशस्वी करणे हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य असून या कर्तव्याचा कसूर करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल. या दृष्टीने जिल्हा भाजपा अध्यक्ष संतोष शिवरकर यांनी तेलारा अकोट बाळापुर येथील बंडखोराविरुद्ध कारवाई केल्यानंतर आता मूर्तिजापूर येथील चार जणांवर कारवाई केली आहे. या संदर्भातली शिफारस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली असून निवडणूक काळात मिळालेल्या अधिकाराचा वापर करून पक्ष संघटनेच्या विचाराशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांना माफ करण्यात येणार नाही असाही इशारा संतोष शिवरकर यांनी दिला आहे.
कोणतीही अपेक्षा न ठेवता तीन पिढी संघर्ष करून पक्ष विस्तार केला आणि त्या पक्षाला नख लावून बदनाम करण्याचा प्रयत्न व संपण्याचा पक्षाच्या विचारांना ,ताजरांजली देणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
मुर्तीजापुर नगर परिषद निवडणुकी मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवारांचे विरुद्ध प्रचार / कट कारस्थान पक्ष विरोधी कार्यवाही करत असलेले भाजपा चे पदाधिकारी.
. कमलाकर गावंडे – मंडल कार्यकारिणी उपाध्यक्ष
अमोल पिंपळे – भा.ज.यु.मो. जिल्हा उपाध्यक्ष,
. श्रीकांत रामेकर – भा.ज.यु.मो. मंडल अध्यक्ष,
. नितीन भटकर – नमामी गंगे अभियान प्रमुख
यांची भारतीय जनता पार्टी मधून 6 वर्षा करिता हकालपट्टी करण्यात आली असून पुढील 6 वर्षा मध्ये यापैकी कोणालाही बैठकीचा निरोप दिल्या जाणार नाही व कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत संबधित हकालपट्टी केलेल्या व्यक्तींचा काहीही संबंध राहणार नाही. असेही संतोष शिवरकर यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे