
अकोला, 14 डिसेंबर (हिं.स.)।
युवक, युवती तसेच महिला आणि पुरुष नागरिकांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज सकाळी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. सकाळी मुंगीलाल बाजोरिया विद्यालय प्रांगणातून वॉकेथॉनला प्रारंभ झाला. ही वॉकेथॉन तिक्ष्णगत फाउंडेशन यांच्या पुढाकाराने तसेच राज्य बालहक्क संरक्षण आयोग आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती.
या वॉकेथॉनमध्ये राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक अचिंत चांडक, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) चे राष्ट्रीय अध्यक्ष रवी नारा, संस्थापक चेअरमन पद्मश्री मिलिंद कांबळे, तसेच प्रसिद्ध अभिनेते अंकुश चौधरी आणि गौरव मोरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम उद्योजक सुगत वाघमारे, बाल हक्क आयोगाचे माजी सदस्य संजय सेंगर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. वॉकेथॉनने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत लालबहादूर शास्त्री प्रांगणात समारोप केला. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत, आरोग्य हेच संपत्ती हा संदेश दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे