
अकोला, 14 डिसेंबर (हिं.स.)।
आज शेवटच्या दिवशी सभागृहाच्या तासात प्रश्नोत्तराच्या तासांमध्ये आमदार रणधीर सावरकर यांनी तारांकित प्रश्न क्रमांक १५९६१ द्वारे प्रश्न उपस्थित केला होता, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्याकडून देण्यात येणारे विद्यावेतन व थेट प्रशिक्षण पुन्हा सुरु करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला की, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजनेत मासिक विद्यावेतन बंद करून केवळ ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची बाब माहे सप्टेंबर, २०२५ मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय, सदर निर्णयामुळे ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे, तसेच महाज्योती संस्थेला शासनाकडून रुपये १५०० कोटी इतका निधी माहे ऑक्टोबर, २०२५ मध्ये मंजूर करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी प्राप्त निधीतून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि इतर सर्व योजना राबविण्यात येणार असून विद्यावेतन व थेट प्रशिक्षण बंद असलेल्या ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना थेट मार्गदर्शन तसेच आवश्यक भौतिक संसाधने उपलब्ध न टझाल्याने गरीब विद्यार्थ्यांना प्रशिक्षणात नुकसान होणार असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय, असे प्रश्न उपस्थित केले होते, सदरील तारांकित प्रश्नाचे उत्तरात राज्याचे इतर मागास प्रवर्ग कल्याण मंत्री मा. अतुल सावे यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले की, महाज्योती संस्थेमार्फत संघ लोकसेवा आयोग (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, संयुक्त गट ब व क तसेच मिलीटरी भरती प्रशिक्षण या स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपात देण्यात येते. त्याकरिता विद्यार्थ्यांना विद्यावेतन व आकस्मिक निधी देखील देण्याची योजना नियमित सुरू आहे. तथापि, IBPS-PO/Banking/कRailway (IBPS), कर्मचारी निवड आयोग (SSC), रेल्वे भरती (RRB) तसेच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (MES) या परीक्षांचे स्वरूपच ऑनलाईन परिक्षा पध्दती असल्याने विद्यार्थ्यांनी अनेकवेळा ऑनलाईन प्रशिक्षणाची मागणी महाज्योती कार्यालयास केली होती. त्यानुसार सदर प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचे प्रस्तावित असून त्याकरिता विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेमार्फत टॅबलेट व डेटा देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी तसेच संतापाची भावना निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.तसेच महाज्योती संस्थेला सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात विद्यावेतन व प्रशिक्षण या खर्चाकरिता रु.२९९.०० कोटी इतका निधी मंजुर करण्यात आला असून रु. २९९.०० कोटीच्या मर्यादित महाज्योतीमार्फत विविध योजना राबविण्यात येत आहे. त्यापैकी रु.१७९.४० कोटी इतका निधी महाज्योती कार्यालयास वितरीत करण्यात आलेला आहे. आणि प्रशिक्षणासाठी डेटा सिम निवडण्याचे स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना देण्यात आल्याने त्यांच्या क्षेत्रात ज्या स्थिर इंटरनेट सेवा उपलब्ध आहेत त्या विद्यार्थ्यांना घेता येणार असून त्याकरीता लागणारी रक्कम विद्यार्थ्यांना आधार सिडींगद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.,यासर्व चर्चेदरम्यान आमदार रणधीर सावरकरांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणारे संस्था/केंद्र तसेच विद्यार्थी संख्या याबाबत सांख्यिकीय माहिती ठेवण्यात यावी अशी मागणी केली, करून विद्यार्थी आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याची मागणी आमदार सावरकर यांनी केली व शासनाचे लक्ष वेधले
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे