
बीड, 14 डिसेंबर (हिं.स.)।
अंबाजोगाई येथे राज्यस्तरीय पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. बीड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, अंबाजोगाई
क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, रोटरी क्लब आणि यशवंतराव चव्हाण
महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
तहसीलदार विलास तरंगे यांनी दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे प्रांतपाल सुधीर लातूरे होते. व्यासपीठावर पोलिस निरीक्षक शरद जोगदंड, समाजसेवक अनिकेत लोहिया, प्राचार्य डॉ. बाबू खडकभावी, हेमंत रामढवे, डॉ. राजेश इंगोले, डॉ. नितीन पोतदार, वकिल संघाचे अध्यक्ष अजित लोमटे आदी उपस्थित होते.
तहसीलदार तरंगे म्हणाले, शारीरिक
विकासासाठी खेळ आहेत. खेळामुळे विकासही घडतो. आवश्यक मानसिक अध्यक्षीय समारोपात सुधीर लातूरे यांनी सांगितले, मानवी जीवनात खेळाचे महत्त्व मोठे आहे. .
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis