
बीड, 14 डिसेंबर (हिं.स.)। मग्रारोहयो अंतर्गत बीड तालुक्यामध्ये सन २०२३-२४ मधील डिलीट झालेले वर्ककोड लाभार्थ्यांकडून पैसे घेवून, नियमबाह्यपणे पुन्हा सन २०२५-२६ मध्ये काढल्याप्रकरणी गटविकास अधिकारी व सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष बळीराम गवते यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. यानंतर दि.९ डिसेंबर रोजी वादग्रस्त गटविकास अधिकारी अशोक राठोड यांच्याकडील पदभार काढून त्याठिकाणी अनिरूध्द सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis