बारामती–इंदापूर मार्गावरील पुलाचे काम ठप्प
पुणे, 14 डिसेंबर (हिं.स.)। लिमटेक (ता. बारामती) परिसरातील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील बारामती-इंदापूर मार्गावर सुरू असलेले पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस तीव होत आहे. 2021 मध्ये सुरू झालेल्या या कामाल
बारामती–इंदापूर मार्गावरील पुलाचे काम ठप्प


पुणे, 14 डिसेंबर (हिं.स.)। लिमटेक (ता. बारामती) परिसरातील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील बारामती-इंदापूर मार्गावर सुरू असलेले पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस तीव होत आहे.

2021 मध्ये सुरू झालेल्या या कामाला शासनाने निश्चित केलेली मुदत संपून 31 मार्च 2026 ची नवीन डेडलाइन जाहीर करण्यात आली असून, आतापर्यंत तब्बल तीन वेळा मुदतवाढ मिळूनही काम अपेक्षित गतीने होत नसल्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण असूनही पुलाचे काम रखडल्यामुळे सर्व वाहतूक अरुंद पर्यायी रस्त्यावर वळविण्यात आली आहे. परिणामी, दिवसभर लांबच लांब वाहनरांगा, वाहतुकीची कोंडी, धुळीचे सामाज्य व असुरक्षित वळणांचे संकट असे चित्र येथे कायम आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande