बीड लोकअदालतीत १३६१ प्रकरणे निकाली,तब्बल १२.53 कोटींची तडजोड
बीड, 14 डिसेंबर (हिं.स.) बीड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १९०४ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. १२ कोटी ५३ लाख रुपयांची तडजोड या प्रकरणांमध्ये झाली. राष्ट्रीय लोक न्यायालयाचे उद्घाटन जिल्हा प्रमुख व सत्र
बीड लोकअदालतीत १३६१ प्रकरणे निकाली,तब्बल १२.53 कोटींची तडजोड


बीड, 14 डिसेंबर (हिं.स.)

बीड जिल्ह्यात राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण १९०४ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली. १२ कोटी ५३ लाख रुपयांची तडजोड या प्रकरणांमध्ये झाली.

राष्ट्रीय लोक न्यायालयाचे उद्घाटन जिल्हा प्रमुख व सत्र न्या. आनंद यावलकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ व्यंकटेश पाटवदकर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश एस. एस. घोरपडे, विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव न्या. डब्ल्यू ए. सय्यद, जिल्हा वकील संघाचे प्रभारी अध्यक्ष आर. व्ही. देशमुख यांची उपस्थिती होती.

राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेवरून बीड जिल्ह्यात या राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन केले गेले होते. यामध्ये बीड जिल्हयातून न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणांपैकी एकूण ८ हजार २६५ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भुसंपादनाची प्रकरणे, १३८ एन.आय. अॅक्टच्या प्रकरणांचा समावेश होता. ५४३ प्रकरणे निकाली निघाली आहेत. दाखलपुर्व प्रकरणामध्ये एकूण ३३ हजार २२१ त्यापैकी १३६१ प्रकरणे निकाली निघाली आहेत.असे एकूण १९०४ प्रकरणे निकाली निघाली आहेत व यामध्ये १२ कोटी ५३ लाख १ हजार ९८२ एवढ्या रकमेची प्रकरणे निकाली निघाली आहेत.

या लोकन्यायालयाच्या

यशस्वितेसाठी बीड मुख्यालयातील सर्व अधिकारी, वकील संघाचे प्रभारी अध्यक्ष आर.व्ही. देशमुख, संघाचे सर्व सदस्य, सरकारी वकील व सर्व सरकारी अभियोक्ता यांची लोकन्यायालयात प्रमुख उपस्थिती होती.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande