पंकज चौधरी बनले उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष
लखनऊ, 14 डिसेंबर, (हिं.स.)।भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवार, 14 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. 13 डिसेंबर रोजी झालेल्या नामांकन प्रक्रियेत केवळ पंकज
पंकज चौधरी बनले उत्तर प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष


लखनऊ, 14 डिसेंबर, (हिं.स.)।भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश भाजपाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रविवार, 14 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. 13 डिसेंबर रोजी झालेल्या नामांकन प्रक्रियेत केवळ पंकज चौधरी यांचेच नामांकन दाखल झाल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत आज लखनऊ येथे त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली.

पंकज चौधरी हे महाराजगंज लोकसभा मतदारसंघातून सात वेळा खासदार राहिले आहेत. ते कुर्मी समाजातून येतात, जो इतर मागासवर्ग (ओबीसी) अंतर्गत येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे ते विश्वासू मानले जातात.कुर्मी समाजाचा संपूर्ण उत्तर प्रदेशातील ओबीसी समाजात मोठा प्रभाव आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि 2022 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये या समाजाने राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाकडे झुकाव दाखवला होता.

पंकज चौधरी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक पातळीवर केली. 1989 ते 1991 या काळात त्यांनी गोरखपूरमध्ये नगरसेवक म्हणून काम केले. या काळात त्यांनी एक वर्ष नगरपालिकेचे उपमहापौर (डेप्युटी मेयर) म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्यानंतर त्यांची गोरखपूरचे उपमहापौर म्हणून नियुक्ती करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande