रत्नागिरीत माघी गणेशोत्सवानिमित्त २२ जानेवारीला ढोल वादन स्पर्धा
रत्नागिरी, 14 डिसेंबर, (हिं. स.) : माघी गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे ढोल वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता विश्वनगर येथे होणार आहे.या स्पर्धेचे आयोजन भाजपाचे नीलेश आखाडे यांच्य
रत्नागिरीत माघी गणेशोत्सवानिमित्त २२ जानेवारीला ढोल वादन स्पर्धा


रत्नागिरी, 14 डिसेंबर, (हिं. स.) : माघी गणेशोत्सवानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे ढोल वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा गुरुवार, दि. २२ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता विश्वनगर येथे होणार आहे.या स्पर्धेचे आयोजन भाजपाचे नीलेश आखाडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

माघी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी ही ढोल वादन स्पर्धा घेतली जाते. त्यामुळे या स्पर्धेपासूनच तालुक्यासह परिसरातील माघी गणेशोत्सवातील ढोलवादन स्पर्धांना सुरुवात होते, म्हणून या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

स्पर्धेत पहिले तीन क्रमांक मिळविणाऱ्या संघांसह उत्कृष्ट ढोलवादक, उत्कृष्ट ताशावादक तसेच उत्कृष्ट वेशभूषा संघांना आकर्षक चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेत जास्तीत जास्त ढोलवादन संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक नीलेश महादेव आखाडे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande