महसूलमंत्री बावनकुळे यांनी घेतला फुलंब्री मतदारसंघाचा आढावा
छत्रपती संभाजीनगर, 14 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर केले. नागपूर येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात फु
अ


छत्रपती संभाजीनगर, 14 डिसेंबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर केले.

नागपूर येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात फुलंब्री विधानसभा मतदारसंघाशी संबंधित महत्त्वाच्या महसुली विषयांवर आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी नगरविकास विभागांतर्गत बांधकाम परवानगी मिळण्यासंबंधीच्या अडचणी, तसेच चिकलठाणा, जि.छत्रपती संभाजीनगर येथील गायरान जमीन महापालिका व इतर शासकीय विभागांना उपलब्ध करून देण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

मतदारसंघातील विकासकामांना गती मिळावी, नागरिकांचे प्रश्न वेळेत मार्गी लागावेत आणि प्रशासकीय प्रक्रियांमध्ये सुलभता यावी, या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली. संबंधित विषयांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

याप्रसंगी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त श्री.जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी श्री.दिलीपजी स्वामी, मनपा आयुक्त श्री.जी.श्रीकांत यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande