
रत्नागिरी, 14 डिसेंबर, (हिं. स.) | स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे शकील गवाणकर आणि जमीर खलफे या दोघांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोकणातील विविध क्षेत्रांत निःस्वार्थीपणे उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घेऊन त्यांना कोकणरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात गेली आठ वर्षे सतत सामाजिक कार्य करणाऱ्या संपर्क युनिक फाउंडेशनचे अध्यक्ष शकील गवाणकर आणि रत्नागिरी जिल्हा समितीचे अध्यक्ष पत्रकार जमीर खलफे यांना करण्यात आले .
मुंबईत काल, दि. 13 डिसेंबर रोजी मुंबई मराठी पत्रकार भवनात संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार, संपादक सचिन कळझुनकर उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी धनंजय कुवसेकर, राजेंद्र सुर्वे, सुभाष राणे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते सोहळ्याला उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी