
सोलापूर, 14 डिसेंबर (हिं.स.)।
गेल्या ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत सोलापर जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टी आणि पुर स्थितीमुळे राज्य शासनाच्यावतीने बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात असून, सोलापूर जिल्ह्यातील ई केवायसीअभावी 16 हजार 15 शेतकऱ्यांचे 17 कोटी 89 लाख 72 हजार 691 रूपये प्रलंबित राहिले आहेत.अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बाधित 7 लाख 64 हजार 173 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी 867 कोटी 37 लाख 63 हजार 855 रूपयांची मागणी अहवालाद्वारे केली होती. 6 लाख 15 हजार 862 शेतकऱ्यांसाठी 748 कोटी 40 लाख 91 हजार 972 रूपये मंजूर झाले असून, त्यापैकी 5 लाख 67 हजार 272 शेतकऱ्यांच्या खात्यावर आजतागायत 683 कोटी 30 लाख 82 हजार 70 रूपये झाले जमा झाले आहेत.
नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाने फार्मर आयडी बंधनकारक केले होते. परंतू बहुतांश शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसल्याने ते मदतीपासून वंचित राहिले होते. त्यामुळे शासनाने नियमांत शिथिलता आणून ई केवायसी बंधनकारक केले. ई केवायसीसाठी राज्य शासनाने शिबीरे घेतली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड