
नागपूर, 14 डिसेंबर, (हिं.स.)। ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाज्योती मार्फत स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण योजना राबवण्यात येते. आता ही योजना ऑनलाइन राबवण्यात येणार आहे. जी संस्था हे काम करणार ती राजस्थानची आहे,त्याऐवजी हे प्रशिक्षण ऑफलाईन देण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात वडेट्टीवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण ऑनलाइन देण्यात येणार असल्याने त्यांचे विद्यावेतन मिळालेले नाही. विद्यार्थ्यांनी काल आंदोलन देखील केले. यावर्षी महाज्योतीला जो निधी दिला आहे तो कमी आहे.. लोकसंख्येच्या हिशोबाने महाज्योतीला अधिकचा निधी द्यावा तसेच महाज्योतीचे गेल्यावर्षीचा निधी देखील प्रलंबित आहे. तो ही देण्यात यावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.
यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी ऑफलाईन प्रशिक्षणाची मागणी असेल तर ऑफलाईन ही देण्यात येईल हे स्पष्ट केले. निधी कमी दिला यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले ज्या विभागाला कमी निधी देण्यात आला आहे याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांच्या बरोबर बैठक झाली आहे, मार्च मधील पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात येईल असे आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर