शेतकऱ्यांना मारहाण करून पैसे वसुली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - वडेट्टीवार
नागपूर, 14 डिसेंबर (हिं.स.)। राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांकडील भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. शेतकरी अशी जनावर विकू शकत नाही. राज्यात गोरक्षक नावाखाली टोळ्या तयार झाले आहेत ते शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत असल्याचा गंभीर आरोप काँग
शेतकऱ्यांना मारहाण करून पैसे वसुली करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा - वडेट्टीवार


नागपूर, 14 डिसेंबर (हिं.स.)। राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे शेतकऱ्यांकडील भाकड जनावरांची संख्या वाढली आहे. शेतकरी अशी जनावर विकू शकत नाही. राज्यात गोरक्षक नावाखाली टोळ्या तयार झाले आहेत ते शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील भाकड जनावरांबाबत प्रश्न उपस्थित केले. गोवंश हत्याबंदी कायदा आहे. जेव्हा शेतकरी जनावरांची वाहतूक करतात तेव्हा त्यांना थांबवले जाते, धमकी दिली जाते ऐकले नाही तर मारहाण केली जाते. एका १७ वर्षाच्या शेतकऱ्याला इतकी मारहाण केली की त्याने आत्महत्या केली. भाकड जनावर विकून शेतकऱ्यांना काही पैसे तरी मिळतात. पण आता या बोगस टोळ्या शेतकऱ्यांच्या गाड्या थांबवून त्यांच्याकडून पैसे वसुली करतात याविरोधात सरकारने कारवाई केली पाहिजे,ही वसुली थांबवली पाहिजे.

वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की भाकड जनावर प्रकरणी ज्या टोळ्या गैरफायदा घेतात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. याबाबत शेतकरी संघटनेकडून तक्रारी देखील आल्या आहेत. शेतकरी जनावरांची वाहतूक करताना अडवणूक झाली तर अशा लोकांवर कारवाई करण्यात येईल कुणाला पाठीशी घालण्यात येणार नाही, अस मंत्री म्हणाल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande