विजयस्तंभ अभिवादन : शासकीय यंत्रणांनी विविध संघटनांना विश्वासात घेऊन यशस्वी करावा - जिल्हाधिकारी
पुणे, 14 डिसेंबर (हिं.स.)। पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी विविध संघटनांना विश्वासात घेऊन यशस्वी करावा, अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने जिल्हा प्रशासन
विजयस्तंभ अभिवादन : शासकीय यंत्रणांनी विविध संघटनांना विश्वासात घेऊन यशस्वी करावा - जिल्हाधिकारी


पुणे, 14 डिसेंबर (हिं.स.)। पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी विविध संघटनांना विश्वासात घेऊन यशस्वी करावा, अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या. अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटनांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुणे शहर पोलिस उपायुक्त सोमय मुंढे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी चंद्रकांत वाघमारे, पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, वाहतूक पोलिस आयुक्त हिंमत जाधव, समाज कल्याण उपायुक्त वंदना कोचुरे, सहायक आयुक्त तथा बार्टीचे निबंधक विशाल लोंढे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande