पुण्यात होणार 10 दर्जेदार रस्त्यांचा विकास
पुणे, 14 डिसेंबर (हिं.स.)। शहराच्या विकास आराखड्यातील (डीपी) प्रमुख रस्ते एकाच वेळी विकसित करण्यासाठी निधी अपुरा आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले 10 रस्ते निवडून त्यांचा संपूर्ण विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आह
पुण्यात होणार 10 दर्जेदार रस्त्यांचा विकास


पुणे, 14 डिसेंबर (हिं.स.)। शहराच्या विकास आराखड्यातील (डीपी) प्रमुख रस्ते एकाच वेळी विकसित करण्यासाठी निधी अपुरा आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सर्वाधिक प्राधान्यक्रम असलेले 10 रस्ते निवडून त्यांचा संपूर्ण विकास करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.या कामांसाठी पुढील आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र निधी तरतूद केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. या प्राधान्य रस्त्यांत कात्रज, बाणेर, बालेवाडी, पाषाण परिसरातील मार्गांचा समावेश आहे.महापालिकेने डीपीतील 10 महत्त्वाच्या रस्त्यांची यादी तयार केली आहे. हे रस्ते पूर्ण विकसित झाल्यानंतर आजुबाजूच्या परिसरातील विकासाला चालना मिळेल, तसेच नागरिक आणि वाहनचालकांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande