सोलापुरात काँग्रेसच्या रियाज हुंडेकरी यांनी प्रभाग बदलला
सोलापूर, 14 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. नुकतेच सोलापुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीची बैठक घेऊन महापालिका निवडणूक एकत
सोलापुरात काँग्रेसच्या रियाज हुंडेकरी यांनी प्रभाग बदलला


सोलापूर, 14 डिसेंबर (हिं.स.)। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. नुकतेच सोलापुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीची बैठक घेऊन महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याची घोषणा केली आहे.दरम्यान काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी यांनी आपला अठरा नंबर प्रभाग सोडून शेजारच्या एकवीस नंबर प्रभागात जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आपला इच्छुक उमेदवारी अर्ज अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या कडे दाखल केला. सोबतीला अनुसूचित जाती महिलेतून माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांच्या कन्या प्रतीक्षा निकाळजे, सर्वसाधारण महिलेतून भीमाशंकर टेकाळे यांच्या सून किरण शीतलकुमार टेकाळे तर सर्वसाधारण जागेसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेतून एक उमेदवार येणार असल्याचे सांगण्यात आले .

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande