
अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.)तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रामतीर्थ फाट्या जवळ एका धावत्या कारला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना रविवार (दि.१४) सायंकाळी सात वाजता सुमारास घडली आहे. या आगीत चार चाकी वाहन हे पूर्णतः जळून खाक झाले आहे .सदर आग शॉर्टसर्किट झाल्याने लागल्याची माहिती समोर आली आहे. कार चालक तात्काळ बाहेर निघाल्याने जीवीतहानी टळली आहे. घटनेतील आगग्रस्त चारचाकी वाहन अकोल्या जिल्ह्यातील असून वाहन चालक हा दर्यापूर तालुक्यातील जैनपूर येथे आपल्या नातेवाईकाकडे जात असल्याचे समजते. माहीती मिळताच दर्यापूर येथील नगरपालिकेचे अग्निशामक वाहन व पथकातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळविले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी