गोवा नाईटक्लब आग प्रकरण : लुथ्रा बंधू उद्या सकाळी थायलंडहून दिल्ली विमानतळावर पोहोचणार
नवी दिल्ली, 15 डिसेंबर (हिं.स.)गोवा आग प्रकरणातील फरार लुथ्रा बंधूंची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय एजन्सींकडून लुथ्रा ब्रदर्सना औपचारिकरित्या ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक आज रात्री उशिरा दिल्लीला रवाना हो
लुथ्रा बंधू उद्या सकाळी थायलंडहून दिल्ली विमानतळावर पोहोचणार


नवी दिल्ली, 15 डिसेंबर (हिं.स.)गोवा आग प्रकरणातील फरार लुथ्रा बंधूंची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय एजन्सींकडून लुथ्रा ब्रदर्सना औपचारिकरित्या ताब्यात घेण्यासाठी गोवा पोलिसांचे एक पथक आज रात्री उशिरा दिल्लीला रवाना होईल. पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, गोवा पोलीस थायलंडला जाणार नाहीत. लुथ्रा बंधूंना प्रथम दिल्लीला आणले जाईल आणि नंतर गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल. त्यानंतर आरोपींना २४ तासांच्या ट्रान्झिट रिमांडवर घेतले जाईल.

वेळापत्रकानुसार, लुथ्रा बंधू उद्या रात्री उशिरा गोव्यात येण्याची अपेक्षा आहे. आगमनानंतर, त्यांना थेट अंजुना पोलीस स्टेशनमध्ये नेले जाईल. जिथे त्यांची या प्रकरणाबाबत कसून चौकशी केली जाईल. आरोपींना १७ डिसेंबर रोजी मापुसा न्यायालयात हजर केले जाऊ शकते.

दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, गोवा सरकारने संपूर्ण प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी कायदेशीर आणि अभियोजन विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक विशेष कायदेशीर पथक तयार केली आहे. पोलिसांनी लुथरा बंधूंवर भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १०५ अंतर्गत आरोप लावले आहेत, ज्यामध्ये १० वर्षांपर्यंतची शिक्षा आहे. तपास अधिकारी आरोपींविरुद्ध विविध कथित उल्लंघनांचे पुरावे गोळा करत आहेत जेणेकरून एक मजबूत आरोपपत्र तयार करता येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande