छ. संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे पक्षाच्या समित्या
छत्रपती संभाजीनगर, 15 डिसेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणूक नियोजनासाठी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून जिंकण्यास
छ. संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे पक्षाच्या समित्या


छत्रपती संभाजीनगर, 15 डिसेंबर (हिं.स.) : छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणूक नियोजनासाठी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने समित्या जाहीर करण्यात आल्या आहेत

येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून जिंकण्यासाठी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नागपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पक्षांतर्गत निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी समित्यांचे गठन करण्यात आले.

मुख्य समन्वय समितीमध्ये पालकमंत्री संजय शिरसाट ,खासदार संदिपान भुमरे ,आमदार प्रदीप जैस्वाल ,जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ ,युवा सेनेचे ऋषिकेश जयस्वाल यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच यासोबतच आमदार माजी आमदार माजी महापौर मुख्य शिवसेना पदाधिकारी यांचा समावेश आहे महानगरपालिकेच्या निवडणुका ताकतीने लढण्याच्या व जिंकण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला

------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande