मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोर्शी शहरात स्थलांतरित करा  ! 
हितेश साबळे यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.)।मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे चांदूर बाजार मार्गावरील मोर्शी शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. येरला फार्ममधून हे कार्यालय मोर्शी शहरात स्थलांतर क
मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोर्शी शहरात स्थलांतरित करा  !   हितेश साबळे यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी !


हितेश साबळे यांची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मागणी अमरावती, 15 डिसेंबर (हिं.स.)।मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालय हे चांदूर बाजार मार्गावरील मोर्शी शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. येरला फार्ममधून हे कार्यालय मोर्शी शहरात स्थलांतर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस हितेश साबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन निवेदन देऊन केली. मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आठ वर्षांपूर्वी तालुका कृषी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय मोर्शी येथील बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मनोरमा कॉम्प्लेक्समध्ये होते. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी तालुका कृषी कार्यालयात जाऊन आपली शेतीविषयक कामे करून घेत होते. शेतकऱ्यांना कृषी खात्याच्या योजनांचा लाभ घेता येत होता. पण, कृषी विभागाने तालुका कृषी अधिकारी कार्यालय सुमारे आठ वर्षांपूर्वी चांदूर बाजार मार्गावरील तालुका रोपवाटिका केंद्र येथे हलविले. आजच्या स्थितीत ज्या ठिकाणी तालुका कृषी कार्यालय आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जाण्याची कोणतीही सोय नाही व्यवस्था नाही. कार्यालयात ये-जा करण्यासाठी जवळपास शंभर रुपये खर्च होत असून शेतकऱ्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय शहरापासून दूर असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणीसुद्धा मिळत नाही. वीजपुरवठा सतत चालू-बंद होत राहतो. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कामे करताना अनेक त्रासाला समोर जावे लागत असतांना तालुका कृषी कार्यालयातील काही अधिकारी फिल्डवर राहतात, तर बहुसंख्य महिला कर्मचारी कार्यालयात असतात. त्यामुळे महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोर्शीतील सर्व शासकीय कार्यालये अमरावती व वरूड या मुख्य रस्त्यावर आहेत. त्यामुळे कृषी अधिकारी कार्यालय कृषी विकास व सुरक्षा दृष्टीने शहरात मुख्य रस्त्यावर हलविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस हितेश साबळे यांच्यातर्फे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन करण्यात आली त्यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोर्शी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोर्शी शहरामध्ये स्थलांतरित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार असल्याची माहिती हितेश साबळे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande