नांदेड : एकनाथ शिंदे यांच्याकडून योग शिबिराचे कौतुक
नांदेड, 15 डिसेंबर (हिं.स.)। उत्तर विधानसभा मतदारसंघातील विकासाची कामे करत असतानाच जनतेची आरोग्य उत्तम राहावे निरोगी राहावे यासाठी आ. बालाजीराव कल्याणकर यांनी पुढाकार घेऊन संगीतमय योग शिबिर आयोजित केले. या योग शिबिरातून आपल्या सर्वांच्या मानसिक स्
नांदेड : एकनाथ शिंदे यांच्याकडून योग शिबिराचे कौतुक


नांदेड, 15 डिसेंबर (हिं.स.)। उत्तर विधानसभा मतदारसंघातील विकासाची कामे करत असतानाच जनतेची आरोग्य उत्तम राहावे निरोगी राहावे यासाठी आ. बालाजीराव कल्याणकर यांनी पुढाकार घेऊन संगीतमय योग शिबिर आयोजित केले. या योग शिबिरातून आपल्या सर्वांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण लाभ होणार आहे . त्यामुळे शिबिर संपले असले तरी तुम्ही मात्र नियमितपणे स्वतःसाठी योग करत रहा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी केले.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात सह नांदेड शहरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य आणि वैयक्तिक जीवन सुदृढ आणि समृद्ध असावे आरोग्यदायी असावे यासाठी आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या संकल्पनेतून भक्ती लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या रोगमुक्त संगीतमय योग शिबिराचा थाटात समारोप करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभासी माध्यमातून या योग शिबिराचा समारोप केला.यावेळी दीप प्रज्वलना करिता सेवानिवृत्त प्राचार्य व शिक्षण तज्ञ राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. अरविंद देशमुख, लेखक भगवान अंजनीकर, उत्तम वक्ते डॉ. दीपक कासराळीकर, ज्येष्ठ नाट्य कलावंत त्र्यंबक मगरे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, इंजि. तानाजी हुसेकर, ब्रह्मकुमारीज शिवप्रेमा बहिणजी, ब्रह्मकुमारीज जयमाला बहिणजी, उपस्थितीत होते. यावेळी योग गुरु नांदेड भूषण सिताराम सोनटक्के यांना सन्मानपत्र देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande