राष्ट्रपतींनी राज कुमार गोयल यांना मुख्य माहिती आयुक्त म्हणून दिली शपथ
नवी दिल्ली, 15 डिसेंबर (हिं.स.)। देशाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांनी शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोयल यांना पदाची शपथ दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्
President


President oath raj kumar goel


नवी दिल्ली, 15 डिसेंबर (हिं.स.)। देशाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांनी शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोयल यांना पदाची शपथ दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ३ जणांच्या समितीने गोयल यांच्या नावाची शिफारस गेल्या आठवड्यात या पदासाठी केली. राजकुमार गोयल हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९९० च्या तुकडीतले अधिकारी असून केंद्रसरकारच्या न्याय विभागाचे सचिव म्हणून गेल्या ऑगस्टमधे सेवानिवृत्त झाले. या समितीने इतर ८ आयुक्तांची नावंही सुचवली असून, तब्बल ९ वर्षांनंतर माहिती आयोगात सर्व आयुक्तांची पदं भरली आहेत.

उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, वरिष्ठ अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande