धनंजय मुंडे यांनी अमित शाह यांची घेतली भेट
बीड, 17 डिसेंबर (हिं.स.)। माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. आमदार मुंडे यांनी सांगितले कि,परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रस
Q


बीड, 17 डिसेंबर (हिं.स.)। माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली.

आमदार मुंडे यांनी सांगितले कि,परळी वैद्यनाथ स्थित प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थ स्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेत समावेश करण्याबाबत विनंती केली. मात्र एकीकडे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पदावर आलेल्या गंडांतराच्या पार्श्वभूमीवर या भेटीवरून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाली आहे.

या योजनेच्या माध्यमातून ज्योतिर्लिंग स्थळाचा विकास व कायाकल्प झाल्यास परळी शहरासह संपूर्ण बीड जिल्ह्याच्या विकासात एक मोठा व सकारात्मक बदल घडणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात चर्चा केली. पूर्वनियोजित वेळ घेतल्याप्रमाणे ही भेट होती. असे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande