भारताचे ढाकातील व्हिसा केंद्रात पुन्हा कामकाज सुरू ; इतर दोन ठिकाणी काम अद्यापही स्थगित
नवी दिल्ली, 18 डिसेंबर (हिं.स.)।भारताने गुरुवारी ढाका येथील आपल्या व्हिसा अर्ज केंद्रात (आयव्हीएसी) पुन्हा कामकाज सुरू केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे केंद्र बुधवारी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, बांग्लादेशातील इतर दोन ठिकाणी अद्यापही कामकाज स्थ
भारताचे ढाकातील व्हिसा केंद्रात पुन्हा कामकाज सुरू ; इतर दोन ठिकाणी काम अद्यापही स्थगित


नवी दिल्ली, 18 डिसेंबर (हिं.स.)।भारताने गुरुवारी ढाका येथील आपल्या व्हिसा अर्ज केंद्रात (आयव्हीएसी) पुन्हा कामकाज सुरू केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे केंद्र बुधवारी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, बांग्लादेशातील इतर दोन ठिकाणी अद्यापही कामकाज स्थगितच आहे. दक्षिण-पश्चिमेकडील खुलना आणि उत्तर-पश्चिमेकडील राजशाही येथील भारतीय व्हिसा अर्ज केंद्रेही सुरक्षेच्या कारणांमुळे बंद करण्यात आली आहेत.

बांग्लादेशात एकूण पाच भारतीय व्हिसा अर्ज केंद्रे आहेत. ढाका, खुलना आणि राजशाही यांशिवाय उत्तर-पूर्वेकडील बंदर शहर चट्टोग्राम आणि उत्तर-पूर्वेकडील सिल्हेट येथेही ही केंद्रे आहेत. ढाक्यातील जमुना फ्यूचर पार्कमध्ये असलेले व्हिसा अर्ज केंद्र राजधानीतील सर्व भारतीय व्हिसा सेवांसाठी एकत्रित केंद्र म्हणून कार्यरत आहे.

व्हिसा केंद्राशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की ढाक्यातील भारतीय व्हिसा अर्ज केंद्र आता पुन्हा सुरू झाले असून ते नियमितपणे काम करत आहे. भारतीय उच्चायोगाने आपल्या संकेतस्थळावर माहिती दिली की, गुरुवारी खुलना आणि राजशाही येथील दोन व्हिसा अर्ज केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. याआधी बुधवारी ढाका येथील केंद्राने वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरते बंद राहणार असल्याची घोषणा केली होती. भारतविरोधी निदर्शकांचा एक मोठा समूह ढाक्यातील भारतीय उच्चायोगाच्या दिशेने कूच करत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती.

यापूर्वीच बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीतील बांग्लादेशचे उच्चायुक्त रियाज हमीदुल्लाह यांना बोलावून घेतले होते. ढाका येथील भारतीय मिशनच्या परिसरात सुरक्षा संकट निर्माण करण्याच्या काही अतिरेकी घटकांच्या कटाच्या घोषणेबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande