टॅरिफच्या माध्यमातून जागतिक व्यापाराला शस्त्र बनवलं जातंय : निर्मला सीतारमण
नवी दिल्ली, 17 डिसेंबर (हिं.स.)। टॅरिफ (शुल्क) आणि इतर उपायांच्या माध्यमातून जागतिक व्यापाराचे वेगाने शस्त्र म्हणून वापर केले जात आहे. अशा परिस्थितीत भारताने अत्यंत सावधपणे पुढे जाण्याची गरज आहे. असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या
Nirmala Sitharaman


नवी दिल्ली, 17 डिसेंबर (हिं.स.)। टॅरिफ (शुल्क) आणि इतर उपायांच्या माध्यमातून जागतिक व्यापाराचे वेगाने शस्त्र म्हणून वापर केले जात आहे. अशा परिस्थितीत भारताने अत्यंत सावधपणे पुढे जाण्याची गरज आहे. असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले. त्यांनी पुढे नमूद केले की, देशाच्या अर्थव्यवस्थेची एकूण मजबुती भारताला अतिरिक्त फायदा मिळवून देईल.

नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या की, जागतिक पातळीवर आता हे “पूर्णपणे स्पष्ट” झाले आहे की व्यापार स्वतंत्र आणि निष्पक्ष राहिलेला नाही. निर्मला सीतारमण म्हणाल्या, “शुल्क आणि इतर अनेक उपायांच्या माध्यमातून व्यापाराचे शस्त्रीकरण केले जात आहे. त्यामुळे भारताला काळजीपूर्वक वाटाघाटी कराव्या लागतील. केवळ शुल्कांशी सामना करणे पुरेसे ठरणार नाही; उलट, आपल्या अर्थव्यवस्थेची एकूण मजबुतीच आपल्याला तो अतिरिक्त लाभ देईल.”

त्या पुढे म्हणाल्या, “भारताला असे सांगून उपदेश केला जाऊ शकतो की तुम्ही (भारत) फार अंतर्मुखी आहात, तुम्ही शुल्कांचे बादशाह आहात वगैरे. मात्र, शुल्कांचा गैरवापर शस्त्र म्हणून केला जात आहे.” अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, भारताचा कधीही शुल्कांचा वापर शस्त्र म्हणून करण्याचा हेतू नव्हता. आज मात्र व्यापाराचा शस्त्र म्हणून वापर कोणतीही टीका न होता होत असल्याचे त्या म्हणाल्या. काही देश सांगतात की शुल्क चांगले नाहीत आणि कोणीही असा उपाय करू नये. पण “अचानक काही नवे लोक पुढे येऊन म्हणतात की आम्ही शुल्क अडथळे उभे करू, आणि त्यावर कोणताही प्रश्न उपस्थित केला जात नाही. त्यामुळे असे वाटते की हाच नवा सामान्य (न्यू नॉर्मल) प्रवाह बनला आहे.”

अमेरिकेने लावलेल्या उच्च शुल्कांमुळे जागतिक व्यापारात अडथळे निर्माण झाले असून, त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांची ही वक्तव्ये महत्त्वाची ठरतात. याशिवाय, मेक्सिकोनेही अलीकडेच ज्या देशांशी त्याचे मुक्त व्यापार करार नाहीत, अशा देशांवर उच्च टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande