
* शुक्रवारी होणार सुनावणी
मुंबई, १७ डिसेंबर (हिं.स.) : राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. त्यानंतर कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने तातडीच्या सुनावणीस नकार दिला आहे. त्यामुळे आता कोकाटेंची अटक आता जवळपास निश्चित आहे. शुक्रवार, १९ डिसेंबरला या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती आर एन लढ्ढा यांच्या एकल पीठासमोर सुनावणी झाली. नाशिक न्यायालयाने मंत्री कोकाटे यांना बनावट कागदपत्रांच्या आरोपाखाली दोषी ठरवले आणि 2 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर कोकाटेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
कोकाटेंचे वकील अनिकेत निकम यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, हे नवीन पुनरावलोकन आहे. सुनावणीपूर्वीच सत्र न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निकालावर शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यांना त्यांचे मंत्रीपद आणि आमदारकी सांभाळावी लागणार आहे. त्यांना ४६७ आणि काही कलमांतून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी