कर प्रशासनातील गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये आयकर अधिकाऱ्यांनी देश हित समोर ठेवून काम करावे - संजय मूर्ति
नागपूर, 17 डिसेंबर (हिं.स.)। कर अधिकाऱ्यांनी गुंतागुंतीच्या कर प्रकरणात विवेकबुद्धी आणि कार्यतत्परतेने सामोरे जावे आणि देश हितासाठी आर्थिक विकासात योगदान देण्याकरिता आपल्या अनुभवाचा वापर करावा, असे आवाहन भारताचे महालेखापरीक्षक आणि नियंत्रक (कॅग)
K. Sanjay Murthy


K. Sanjay Murthy


नागपूर, 17 डिसेंबर (हिं.स.)। कर अधिकाऱ्यांनी गुंतागुंतीच्या कर प्रकरणात विवेकबुद्धी आणि कार्यतत्परतेने सामोरे जावे आणि देश हितासाठी आर्थिक विकासात योगदान देण्याकरिता आपल्या अनुभवाचा वापर करावा, असे आवाहन भारताचे महालेखापरीक्षक आणि नियंत्रक (कॅग) के.संजय मूर्ति यांनी नागपूर येथे केले.

राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी - एनएडिटी येथे भारतीय महसूल सेवेच्या (आयआरएस) 79व्या तुकडीच्या उद्घाटन समारंभाला मुख्य अतिथी म्हणून संबोधित करत होते.याप्रसंगी नागपूरच्या प्रधान आयकर आयुक्त मालती श्रीधरण, एनएडीटीचे महासंचालक एस.के मॅथ्यूज प्रामुख्याने उपस्थित होते.

देशातील आर्थिक विकासाला तसेच प्रगतीला चालना देणाऱ्या सेवांपैकी भारतीय राजस्व सेवा ही महत्त्वाची असून या सेवेतील अधिकाऱ्यांनी कर प्रशासनातील गुंतागुंत समजून घेण्याकरिता इतरही विभागांच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करायला हवा असे मूर्ति यांनी सांगितले .राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीला क्षमता निर्माण आयोग सीबीसी द्वारे नुकतेच मिळालेले पंचतारांकित नामांकन हे इतर शासकीय प्रशिक्षण संस्थाकरिता आदर्शवत ठरेल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

आय आर एस अधिकाऱ्यांनी त्यांच्या ज्ञान कक्षा रुंदवण्याकरिता तसेच एक परीक्षक म्हणून लेखापरीक्षण विभागाच्या कार्यप्रणालीचा देखील अभ्यास करून करप्रशासनात आवश्यक असणाऱ्या परीक्षण आणि लेखा या कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा असा सल्लादेखील के.मूर्ती यांनी दिला.

79 व्या आयआरएस अधिकाऱ्यांच्या तुकडीचा प्रशिक्षण अहवाल मांडताना या अभ्यासक्रमाचे संचालक सलील बिजूर यांनी सांगितलं की ,या तुकडीमध्ये एकूण 182 अधिकारी असून यात 2 रॉयल भूतान सर्विस मधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे . सर्वात तरुण अधिकाऱ्यांचे वय 23 वर्षे असून या बॅचमध्ये 67% महिला प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत तर 49% अधिकाऱ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी ही अभियांत्रिकीची आहे. 47 प्रशिक्षणार्थी अधिकारी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तर 2 अधिकारी हे पीएचडी पीएचडी प्राप्त केलेले आहेत.सर्वात जास्त अधिकारी उत्तर प्रदेश मधून असून त्यानंतर राजस्थान महाराष्ट्र आणि केरळ तसेच इतर राज्यातील आहेत.

याप्रसंगी 182 प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना कर प्रशासनाची शपथ अकादमीचे अतिरिक्त महासंचालक सिधरामआप्पा कपट्टनवार यांनी दिली. या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीतील अधिकारी, 78 व्या तुकडीतील अधिकारी,आयकर विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande