यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडली
पुणे, 17 डिसेंबर (हिं.स.) भारताचा अनुभवी सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जयस्वालने पोटात दुखण्याची तक्रार केली आणि त्याला तपासणीसाठी दाखल करण्यात आले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुपर लीग
यशस्वी जयस्वाल


पुणे, 17 डिसेंबर (हिं.स.) भारताचा अनुभवी सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालची प्रकृती अचानक बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जयस्वालने पोटात दुखण्याची तक्रार केली आणि त्याला तपासणीसाठी दाखल करण्यात आले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुपर लीग सामन्यानंतर जयस्वालने तीव्र पोटदुखीची तक्रार केली आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला पूर्णपणे विश्रांती घेण्याचा आणि औषधोपचार सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग सामन्यात राजस्थानविरुद्ध खेळताना जयस्वाल खूपच अस्वस्थ दिसत होता. शारीरिक अस्वस्थता असूनही, तो मैदानात उतरला, पण त्याच्या लयीत तो दिसत नव्हता. त्याने १६ चेंडूत फक्त १५ धावा केल्या. पण मुंबईने २१७ धावांचे मोठे लक्ष्य यशस्वीरित्या पार केले होते. या विजयाचे हिरो अजिंक्य रहाणे आणि सरफराज खान होते. सरफराजने फक्त २२ चेंडूत ७३ धावांची झंझावाती खेळी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रहाणेने या सामन्यात ७२ धावांची खेळी केली होती. दरम्यान, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या तीन सामन्यांमध्ये जयस्वालने १६८.६ च्या स्ट्राइक रेटने आणि ४८.३३ च्या सरासरीने १४५ धावा केल्या आहेत.

स्थानिक टी-२० स्पर्धेपूर्वी, जयस्वालने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ७८ च्या प्रभावी सरासरीने १५६ धावा केल्या होत्या. जयस्वाल सध्या भारतीय टी-२० संघाचा भाग नाही आणि त्याला सध्या कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने तत्काळ खेळायचे नाहीत. त्यामुळे, त्याच्याकडे बरे होण्यासाठी पुरेसा कालावधी आहे. ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल आणि मैदानात परतेल अशी अपेक्षा आहे. जयस्वाल सध्या एकदिवसीय आणि कसोटी संघाचा भाग आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande