
दोहा, १७ डिसेंबर (हिं.स.) - पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) आणि फ्रान्सच्या फॉरवर्ड ओस्माने डेम्बेलेला फिफा मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला आहे. तर स्पेन आणि बार्सिलोनाची मिडफिल्डर ऐताना बोनमतीने सलग तिसऱ्या वर्षी फिफा महिला प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे.
२८ वर्षीय डेम्बेले हिने पीएसजीच्या ऐतिहासिक पहिल्या चॅम्पियन्स लीग विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अंतिम सामन्यात इंटर मिलानला ५-० असे पराभूत केले होते. डेम्बेलेने गेल्या हंगामात सर्व स्पर्धांमध्ये एकूण ३५ गोल केले होते. त्यापैकी २१ गोल लीग १ मध्ये केले होते. आणि तो या स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला होता.
ऐताना बोनमतीने चॅम्पियन्स लीग प्लेयर ऑफ द सिझन पुरस्कारही जिंकला आहे. तिने सलग तिसऱ्यांदा महिला बॅलन डी'ओर पुरस्कारही जिंकला होता. बोनमतीने बार्सिलोनाला देशांतर्गत ट्रेबलमध्ये नेले होते. तर स्पेनसोबत ती चॅम्पियन्स लीग फायनल आणि युरो २०२५ च्या फायनलमध्ये पोहोचली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे