सोलापूरात भाजप देणार वडार समाजातील सुशिक्षित चेहरा
सोलापूर, 18 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. 102 जागेसाठी तब्बल 1000 हून अधिक कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी अर्ज दाखल केले आहेत. अनेकांनी पक्ष बदलून भाजपकडे उमेदवारी म
सोलापूरात भाजप देणार वडार समाजातील सुशिक्षित चेहरा


सोलापूर, 18 डिसेंबर (हिं.स.)।

सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडे इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे. 102 जागेसाठी तब्बल 1000 हून अधिक कार्यकर्त्यांनी उमेदवारीची मागणी अर्ज दाखल केले आहेत.

अनेकांनी पक्ष बदलून भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस पक्षाचे माजी कार्यकारी अध्यक्ष सीए सुशील बंदपट्टे यांनी काही दिवसापूर्वीच शहर उत्तर मधील एकूणच भाजपचे वातावरण पाहता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

प्रभाग चार मध्ये भारतीय जनता पार्टी कडून ओबीसी सर्वसाधारण मधून आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांनी उमेदवारी देण्याची मागणी केली असून त्या पद्धतीने त्यांनी पक्षाच्या कार्यालयात जाऊन मुलाखत दिली.

सुशील बंदपट्टे हे वडार समाजातील उच्चशिक्षित युवक असून समाजातून सुद्धा त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात असल्याचे समोर आले आहे. समाजाच्या मागील नगरसेवकाने अनेक कारनामे करत स्वतः सह पक्षाला अडचणीत आणले होते. त्यामुळे नेते व त्यांच्यावर नाराज असल्याचे समजते.

मागील अनेक वर्षापासून चंद्रनील सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. विशेष करून महिला वर्गांसाठी शासनाच्या सर्व योजना त्यांनी मोफत पणे राबवल्या आहेत. कोरोनाच्या काळात त्यांनी अतिशय झोकून देऊन काम केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande